Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ५५९ नवीन कोरोनाबाधित; १ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 07:48 PM2021-05-29T19:48:56+5:302021-05-29T19:50:23+5:30

पुणे शहरात प्रत्यक्ष सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ७ हजार ४४ झाला आहे.

Corona virus Pune: 559 new corona patients in Pune on Saturday; Discharge to 1 thousand 23 patients | Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ५५९ नवीन कोरोनाबाधित; १ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ५५९ नवीन कोरोनाबाधित; १ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज

Next

पुणे : मागील आठवड्यापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू झाली असून शनिवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे अधिक राहिले आहे. शनिवारी दिवसभरात ५५९ नवीन रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात १ हजार २३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ९६३ रुग्ण अत्यवस्थ आहे. 

पुणे शहरात प्रत्यक्ष सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ७ हजार ४४ झाला आहे. दिवसभरात एकूण २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १ हजार ६४७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात २७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. पुण्याबाहेरील ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार २०४ झाली आहे.

शनिवारी एकूण १ हजार २३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५४ हजार १३झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६९ हजार २६१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ७ हजार ४४ झाली आहे.  
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ९६६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २४ लाख ८४ हजार ८७५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus Pune: 559 new corona patients in Pune on Saturday; Discharge to 1 thousand 23 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.