Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ५७३ नव्या रुग्णांची वाढ : ९९९ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:34 PM2021-05-28T19:34:23+5:302021-05-28T19:34:53+5:30
शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ५३५ इतकी आहे.
पुणे : शहरात शुक्रवारी ५७३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ९९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर झालेल्या ८ हजार २०० तपासण्यांमध्ये, कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ६.९८ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ५३५ इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ४१ जणांचा मृत्यू झाला. यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील असून, आजचा मृत्यूदर हा १.७४ टक्के इतका आहे.
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १ हजार ६८७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९८१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ७६ हजार ९०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६८ हजार ७०२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५२ हजार ९९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार १७७ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------