Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:24 PM2021-06-14T21:24:08+5:302021-06-14T21:24:24+5:30

आज शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ४४१ संशयितांची तपासणी

Corona virus Pune: Comfortable! Only 187 corona affected in Pune on Monday; Within three thousand active patients | Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत

Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत

googlenewsNext

पुणे : शहरात सोमवारी १८७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३ हजारच्या आता आली असून, सद्यस्थितीत शहरात २ हजार ८८८ सक्रिय रुग्ण आहेत. 

आज विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ४४१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.४३ टक्के इतकी आहे. तर आज १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ५०२ इतकी असून ऑक्सिजनसह उपकजर घेणाऱ्यांची संख्या ७९९ इतकी आहे.  शहरात आत्तापर्यंत २५ लाख ८२ हजार २१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७४ हजार २९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६२ हजार ९२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

-----------

Web Title: Corona virus Pune: Comfortable! Only 187 corona affected in Pune on Monday; Within three thousand active patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.