Corona Virus Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! शहरात सोमवारी अवघे ४९४ नवे कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:37 PM2021-05-24T20:37:08+5:302021-05-24T20:42:24+5:30
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुणे : पुणे शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट कायम राहिली असून सोमवारी दिवसभरात ४९४ नवे रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात १ हजार ४१० रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १०५९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ७२४ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ४३ झाली आहे. पुण्याबाहेरील १९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४१० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ४८ हजार ३५२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६६ हजार ११९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ७२४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ५८२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली आहे.