Corona Virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ५८८ कोरोनाबाधितांची वाढ : ९२१ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:12 PM2021-05-27T20:12:30+5:302021-05-27T20:13:16+5:30
शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ९९० इतकी आहे.
पुणे : शहरात गुरूवारी ५८८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ९२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर झालेल्या ८ हजार १९३ तपासण्यांमध्ये, कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ७.१७ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ९९० इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ४४ जणांचा मृत्यू झाला यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील असून, आजचा मृत्यूदर हा १.७४ टक्के इतका आहे.
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १ हजार ८६२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९९६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ६८ हजार ७०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६८ हजार १२९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५१ हजार ९९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------