Corona virus : कोरोना 'बाधित व संशयितां'च्या सेवकांची पुणे महापालिका घेणार ‘ विशेष काळजी ’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:46 PM2020-03-21T12:46:10+5:302020-03-21T12:47:53+5:30

कामाचा जास्तीचा ताण येऊ नये म्हणून नव्याने अधिकच्या २० डॉक्टर व ४० नर्स यांची नियुक्ती केली जाणार

Corona virus : pune Municipal Corporation to take care of Corona affected and suspected servants | Corona virus : कोरोना 'बाधित व संशयितां'च्या सेवकांची पुणे महापालिका घेणार ‘ विशेष काळजी ’

Corona virus : कोरोना 'बाधित व संशयितां'च्या सेवकांची पुणे महापालिका घेणार ‘ विशेष काळजी ’

Next
ठळक मुद्देरुबल अगरवाल  : अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून अधिकची नियुक्ती

पुणे : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच, डॉ़ नायडू हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’बाधित व संशयितांची अहोरात्र काळजी घेऊन उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. आजपासून पालिकेने हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवकांना घरी जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र वाहनव्यवस्था केली आहे. 
महापािलकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी डॉ. नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स यांच्यावर कामाचा जास्तीचा ताण येऊ नये म्हणून नव्याने अधिकच्या २० डॉक्टर व ४० नर्स यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले. 
डॉ. नायडू हॉस्पिलमध्ये साधा सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी करू नये. नागरिकांनी कुठेही विनाकारण गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. स्वयंशिस्तीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अगरवाल यांनी केले. 
लक्षणे आढळून आलेल्यांनी करावा रुग्णवाहिकेचा वापर
परदेशातून आल्यावर पुढील काही दिवसांत संबंधिताला ‘कोरोना’संबंधित लक्षणे आढळून आल्यास त्याने उपचारांसाठी डॉ.नायडू हॉस्पिटलमध्ये येताना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी करावी व या रुग्णवाहिकेतूनच हॉस्पिटलमध्ये यावे़ जेणेकरून संबंधित व्यक्तीचा संसर्ग इतरांना होणार नाही, असे आवाहन रूबल अगरवाल यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेबरोबरच पालिकेच्या १० स्वतंत्र रुग्णवाहिका डॉ़ नायडू हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. 
सद्य:स्थितीला नायडूमध्ये २० निवासी डॉक्टर, ४० नर्ससह १२५ जणांचा वैद्यकीय सेवकांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे़ तीन शिफ्टमध्ये येथे काम करता यावे, याकरिता नव्याने मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, येथील सर्व वैद्यकीय सेवकांना हॉस्पिटलमध्येच जेवणाची व राहण्याची उत्तम सोय देण्यात आल्याचेही अगरवाल यांनी सांगितले.   

 

Web Title: Corona virus : pune Municipal Corporation to take care of Corona affected and suspected servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.