Corona Virus Pune News: पुणे शहरात बुधवारी  १ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित; ६६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 11:24 AM2020-10-01T11:24:16+5:302020-10-01T11:26:04+5:30

बुधवारी दिवसभरात १ हजार ४३१ जण कोरोनामुक्त

Corona virus Pune News: 1thousand 366 new patients in pune city on Wednesday | Corona Virus Pune News: पुणे शहरात बुधवारी  १ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित; ६६ जणांचा मृत्यू

Corona Virus Pune News: पुणे शहरात बुधवारी  १ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित; ६६ जणांचा मृत्यू

googlenewsNext

पुणे : शहरात कोरोनामुक्त होण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी १ हजार ४३१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या तुलनेत कोरोनाबाधितांची झालेली वाढ ही ९५ ने कमी असून, आज नव्याने १ हजार ३३६ जण कोरोनाबाधित झाल्याचे अहवाल प्राप्त झाले.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ६ हजार २५६ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १ हजार ३३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९३२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ५१६ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर तर ४१६ रूग्ण हे आयसीयु विभागात उपचार घेत असून, ३ हजार २१४ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर आज सायंकाळी आठपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २६ जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ५४५ इतकी आहे. तर आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या शहरात १ लाख ४५ हजार २९१ झाली असून, यापैकी  १ लाख २५ हजार २६० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३ हजार ४८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

-----------------------------------

Web Title: Corona virus Pune News: 1thousand 366 new patients in pune city on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.