Corona virus Pune : पुणे शहरात पुन्हा एकदा वाढला कोरोनाबाधितांचा आकडा; बुधवारी ४३२ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:57 PM2021-07-07T21:57:19+5:302021-07-07T21:57:31+5:30
पुणे शहरातील तब्बल २७ लाख ९ हजार ९४६ जणांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली आहे.
पुणे : शहरात बुधवारी दिवसभरात ४३२ कोरोनाबाधित आढळून आले असून २७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ८७१ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ७ हजार २६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,२५२ रुग्ण गंभीर असून ४५४ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख ९ हजार ९४६ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८० हजार ५८२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६९ हजार ८३ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६२८ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------