Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५७ नवे कोरोनाबाधित : २८० जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:03 PM2021-06-28T22:03:20+5:302021-06-28T22:03:31+5:30
पुणे शहरात आत्तापर्यंत २६ लाख ५५ हजार ८९६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.
पुणे : शहरात सोमवारी १५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजमितीला शहरात २ हजार २८९ सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार १७६ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.७५ टक्के इतकी आहे. आज १९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २५१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ५५ हजार ८९६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७७ हजार ७४१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६६ हजार ८७४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------