Corona virus Pune : सकारात्मक! पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ८४० नवे रुग्ण; १ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:33 PM2021-05-22T19:33:56+5:302021-05-22T19:34:42+5:30
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,३०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
पुणे : मागील आठवड्यापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू झाली असून शनिवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने अधिक होते. शनिवारी दिवसभरात ८४० हजार रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात १ हजार ९४९ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,३०९रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा १२ हजार ३३० झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,३०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ९६८ झाली आहे. पुण्याबाहेरील २३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ९४९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ४४ हजार ६१८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६४ हजार ९१६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १२ हजार ३३० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ११ हजार ३८० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २४ लाख २७ हजार ३८० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.