Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट १.९७ टक्के; पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी रूग्णसंख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:04 PM2021-08-02T20:04:44+5:302021-08-02T20:06:41+5:30
यापूर्वी शहरात २४ जुलै रोजी तपासणीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांचा २.३७ टक्के हा सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी रेट नोंदविण्यात आला होता.
पुणे : कोरोनाच्या पहिल्या व दुसºया लाटेत दैनंदिन होणाऱ्या कोरोना संशयितांच्या तपासणीच्या तुलनेत सर्वाधिक कमी रूग्णसंख्या सोमवारी आढळून आली असून, आज शहरातील पॉझिटिव्हिटी रेट १.९७ टक्के इतका खाली आला आहे. यापूर्वी शहरात २४ जुलै रोजी तपासणीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांचा २.३७ टक्के हा सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी रेट नोंदविण्यात आला होता.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार २०० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १४२ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ३०६ असून, दिवसभरात २४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे. शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१८ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ३४५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ९५ हजार १०६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८७ हजार ५६३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७६ हजार ४७८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------