Corona virus in pune : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहचला आता १८ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:34 AM2020-06-09T11:34:45+5:302020-06-09T11:35:10+5:30

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांच्यावर गेले असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा

Corona virus in pune : The time of corona patient double in the city has now reached 18 days | Corona virus in pune : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहचला आता १८ दिवसांवर

Corona virus in pune : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहचला आता १८ दिवसांवर

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास वाढले तीन पटीने

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १८ दिवसांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसांचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदर घटण्याचा वेग कमी असला तरी पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांच्यावर गेले असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६ ते ७ दिवसांचा होता. तर मृत्यूदर १० टक्क्यांहून अधिक होता. ही स्थिती बदलण्यास जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास तीन पटीने वाढले आहे.
 

दुपटीचा कालावधी वाढला
दि. ७ जूनची रुग्णसंख्या गृहित धरल्यास शहरात ७८८१ रुग्णसंख्या होती. हा आकडा दुप्पट होण्यासाठी जवळपास १८ दिवसांचा कालावधी लागला आहे. दि. २० मे रोजी ३८९९ रुग्ण होते. तर दि. ६ मे रोजी २०२९ रुग्णसंख्या होती. ती दुप्पट होण्यासाठी १४ दिवस लागले. त्याआधी हा कालावधी १२ दिवसांचा होता. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सुरूवातीला दुपटीचा कालावधी सहा ते सात दिवसांचाच होता. देशाच्या तुलनेत हा कालावधी तीन ते चार दिवसांनी कमी होता.

मृत्यूदर घसरतोय
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहराचा मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. हा दर जवळपास १३ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. प्रामुख्याने ससून रुग्णालयांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते. पण रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही आता हा दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. मृत्यूदर कमी होण्याचा वेग अत्यंत धीमा आहे.
 

बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय
शहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे उपचारानंतर घरी जाणाऱ्या  रुग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे. सोमवारपर्यंत एकुण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६३ टक्के एवढे होते. मे महिन्याच्या सुरूवातीस हे प्रमाण केवळ २४ टक्क्यांच्या जवळपास होते. रुग्णांना घरी सोडण्याच्या धोरणामध्ये बदल करण्यात आल्याने हे प्रमाण वाढल्याचे दिसते.
------------------

पुणे शहराची कोरोनाची स्थिती (कंसात टक्केवारी)
दिवस            एकुण रुग्ण              बरे झालेले                  मृत्यू
३ मे                १८१७                       ४३३ (२३.८३)             १०१ (५.५५)
१० मे             २४८२                       १०२० (४१.०९)           १४५ (५.८४)
१७ मे              ३४९६                      १७५१ (५०.०८)          १९४ (५.५४)
२४ मे              ४७८२                      २५५० (५३.३२)          २५५ (५.३३)
३१ मे              ६४७२                       ३७८२ (५८.४३)         ३१४ (४.८५)
७ जून             ७८८१                       ५०१९ (६३.६८)         ३७८ (४.७९)
-----------------------------------------------------
रुग्ण दुपटीचा कालावधी
दिवस एकुण रुग्णसंख्या कालावधी
२४ एप्रिल ९८० -
६ मे २०२९ १२
२० मे ३८९९ १४
७ जून ७८८१ १८
----------------------

Web Title: Corona virus in pune : The time of corona patient double in the city has now reached 18 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.