Corona virus in pune : चिंताजनक! पुण्यात बुधवारी सर्वाधिक ४६० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; १२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:30 PM2020-06-18T12:30:02+5:302020-06-18T12:34:30+5:30
कोरोना बाधितांची संख्या १० हजार ६४३
पुणे: पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ४६० नवीन रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ११७ इतकी आहे. पुणे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ७१३ वर जाऊन पोहचली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २ हजार ८४१ जणांचे स्वब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. तर शहरात १२ जणांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. शहरातील एकूण मृत्यूचा आकडा ४८१ इतका झाला आहे. ९ मार्चपासून कालपर्यंत कोरोना बाधितांची संख्या १० हजार ६४३ इतकी झाली आहे. यापैकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजार ४३९ इतकी आहे.
........................................
पिंपरीत चोवीस तासांत ४९ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा
पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून चोविस तासांत ४९ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा झाली आहे. आजअखेर १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ३८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. दिवसभरात शहरातील ४३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये २८ पुरुष आणि १५ महिलांचा समोवश आहे. या रूग्णांवर महापालिकेच्या यशवंतरा चव्हाण स्मृती रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण अधिक आहे. आज आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळेगुरव, पिंपरीगाव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एमबी कॅम्प किवळे, खंडोबामाळ, दिघीरोड भोसरी, दत्त मंदिर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ३८ जणांना घरी सोडले. आजपर्यंत १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ५१३ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण बाधित
एकूण बाधित संख्या - १३२३५
पुणे शहर- १०७४४
पिंपरी चिंचवड- १३१६
कॅन्टोन्मेंट व ग्रामीण - ११७५
मृत्यू- ५४०