Corona Virus Pune: पुणेकरांसाठी सकारात्मक बातमी! कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:12 PM2021-05-08T21:12:29+5:302021-05-08T21:15:08+5:30
पुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४९ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक राहिले. शनिवारी दिवसभरात २ हजार ८३७ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ४ हजार ६७३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४०३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून हा आकडा ३६ हजार ५८६ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४०३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ४०२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ३०४ झाली आहे. पुण्याबाहेरील २३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४ हजार ६७३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४४ हजार ५३९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३६ हजार ५८६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७ हजार ११८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख ६२ हजार ९८१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.