Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:56 PM2020-04-14T17:56:09+5:302020-04-14T17:57:17+5:30

संचारबंदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

Corona virus : Quarantine period of 9223 citizens completed in Indapur | Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण 

Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण 

Next
ठळक मुद्देताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण सुरू

कळस : इंदापुर तालुक्यात परदेशवारी केलेल्या ३९ नागरिकांचा  होम क्वारंटाईन कालावधी पुर्ण झाला आहे तसेच बाहेरगावावरुन आलेले ९४१६ नागरीक होते  यामध्ये ९२२३  नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची स्वयंशिस्त व प्रशासनाचे सतर्कता यामुळे तालुका कोरोनामुक्त राहण्यास मोठी मदत झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पोळ यांनी दिली .
तालुक्यातील नागरिकांचे होम क्वारंटाईन कालावधीत ८ संशयित रुग्णांची पुणे येथे तपासणी करण्यात आली होती. मात्र सर्व अहवाल चांगले आले आहेत त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे. नागरिकांना घरातच थांबण्याच्या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देवुन मोठे सहकार्य केले.  संचारबंदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त राहण्यास मदत झाली आहे. 
तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४४ उपकेंद्र आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयायांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी सतर्क आहेत.  ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण सुरू आहे. तालुक्यातील सर्व मेडिकल दुकांनदाराना सर्दी खोकला व तापाचे रुग्णांना औषधे देताना त्यांची माहिती संकलित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
काही ठिकाणी बाहेर गावातुन आलेले नागरीक माहीती देण्यास नकार देत आहेत. त्याठिकाणी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत शिस्त पाळली जाईल याकडे आमचे लक्ष आहे.

Web Title: Corona virus : Quarantine period of 9223 citizens completed in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.