Corona virus : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'समर्थ भारत' तर्फे पुण्यात नऊ 'कोविड केअर सेंटर' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:36 PM2020-07-28T20:36:41+5:302020-07-28T21:02:46+5:30

पाच लाख लोकसंख्येसाठी एक कोविड केअर सेंटर अशा अंदाजाने ९ सेंटरची होणार उभारणी

Corona virus : Rashtriya Swayamsevak Sangh's 'Samarth Bharat' launches nine 'Covid Care Centers' in Pune | Corona virus : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'समर्थ भारत' तर्फे पुण्यात नऊ 'कोविड केअर सेंटर' 

Corona virus : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'समर्थ भारत' तर्फे पुण्यात नऊ 'कोविड केअर सेंटर' 

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांची माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे विलगीकरण पत्र किंवा महापालिकेकडून येणाऱ्या सूचनांनुसार रुग्णांना दाखल करून घेतले जाणार

पुणे : कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘समर्थ भारत’ तर्फे समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 'समर्थ भारत'तर्फे पुण्यात नऊ कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. पहिले कोविड केअर सेंटर गरवारे महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू झाले आहे. पाच लाख लोकसंख्येसाठी एक कोविड केअर सेंटर अशा अंदाजाने ९ कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. 

कोरोना आपत्तीमध्ये मानसिक स्वास्थ उत्तम राखण्यासाठी बाधित नागरिक व कुटुंबासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ज्याव्दारे समुपदेशक मानसिक, भावनिक आधार देण्याचे काम करीत आहेत. यात आतापर्यंत ११ महिलांसह ६३ हून अधिक समुपदेशकांकडून शंभरपेक्षा अधिक कुटुंबातील २०० हून अधिक नागरिकांचे, ४०० बँक कर्मचारी, २०० विद्यार्थी ऑनलाईन समुपदेशन करण्यात आले आहे.  

समर्थ भारत पुनर्बांधणी योजना कौशल्य विकास व प्रशिक्षण, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, समुपदेशन या पाच गटात राबविली जाणार आहे. गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेपुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. ऑनलाइन पत्रकार परिषदेत समर्थ भारत पुनर्बांधणी योजना व कोविड केअर सेंटरची सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी रा.स्व. संघ पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे, सहकार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी उपस्थित होते.

 

सचिन भोसले म्हणाले, 'समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेचे तीन स्तर करण्यात आले असून यामध्ये मार्गदर्शक मंडळात अनेक मान्यवरांचा सक्रिय सहभाग आहे. या योजनेच्या नियोजन, सुसूत्रीकरण, समन्वयासाठी महानगर सुकाणू समिती व क्रियान्वयन, अंमलबजावणीसाठी भाग कार्यकारी समिती अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. या त्रिस्तरीय रचनेबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, साधन संस्था, धर्मादाय सेवा संस्था, समाज समूह, शासन प्रशासन यांचा स्थानिक स्तरावरील समन्वय साधून हे काम सुरू आहे.'-----

असे आहे कोविड केअर सेंटर

गरवारे महाविद्यालय वसतिगृह सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये २०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्णपणे घरात विलगीकरण होऊ शकत नाही आणि आर्थिक सक्षमता नाही असे रुग्ण महानगरपालिकेच्या वतीने या केंद्रात पाठवले जाणार आहेत. या साखळीतील दुसरे सेंटर डेक्कन भागातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वस्तीगृहात १०० बेडचे विलगीकरण कक्ष तर महाविद्यालयात साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने ३०० बेडचे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे विलगीकरण पत्र किंवा महापालिकेकडून येणाऱ्या सूचनांनुसार रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. सेंटरमध्ये २४ तास स्वयंसेवकांची रचना केली आहे. प्रत्येक रुग्णाची दोन वेळा काढा, आयुर्वेदिक गोळ्या, प्रत्येक खोलीत गरम आणि गार पाण्याची सुविधा, लहान मुलांसाठी खेळणी, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिका रुग्णांचा जेवण, न्याहरीची व्यवस्था तसेच परिसरातील स्वच्छता करण्यात येणार आहे. रुग्णांच्या औषधोपचाराचा खर्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती करणार आहे.

 

Web Title: Corona virus : Rashtriya Swayamsevak Sangh's 'Samarth Bharat' launches nine 'Covid Care Centers' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.