'टेन्शन'मधील पुणेकरांना दिलासा ; कडक निर्बंधांमुळे 'पॉझिटिव्हिटी' रेट ३६ वरून २० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 07:55 PM2021-04-10T19:55:53+5:302021-04-10T20:38:38+5:30

प्रशासनाची मात्रा पडली पुणेकरांना लागू...

Corona virus: relief to Pune residents in 'tension'; Due to strict restrictions, the 'positive' rate has gone up from 36 to 20 per cent | 'टेन्शन'मधील पुणेकरांना दिलासा ; कडक निर्बंधांमुळे 'पॉझिटिव्हिटी' रेट ३६ वरून २० टक्क्यांवर

'टेन्शन'मधील पुणेकरांना दिलासा ; कडक निर्बंधांमुळे 'पॉझिटिव्हिटी' रेट ३६ वरून २० टक्क्यांवर

Next

पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने मागील शनिवारपासून कडक निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ६ नंतर कडक संचारबंदी लागू आहे. मात्र, आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ३६ टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होऊ लागला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. 

पुण्यात फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने कोरोना रुग्णांची वेगाने वाढ होत आहे.मार्च महिन्यात तर हा वेग नवीन विक्रम प्रस्थापित करणारा ठरला आहे. या महिन्यात पुणे शहरात जवळपास ७० हजार रुग्ण सापडले आहे. त्यामुळे साहजिकच प्रशासन यंत्रणांसह पुणेकरांच्या चिंतेत देखील भर पडली होती होती. सर्वच  स्तरावरून वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहे. मात्र आता पुणेकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांवर येण्यास सुरुवात झाली आहे. पण तरीदेखील पुणेकरांना आणखी सतर्कतेने कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे. 

याबाबत बोलताना विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव म्हणाले, पुण्यातील लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. आत्ता १ लाख लोकांना लसी देण्याची मागणी आहे. रविवारी १ लाख लस मिळणार आहे. तसेच सोमवारी पुन्हा १ लाख लसीकरणाची मागणी करण्यात आली आहे. टेस्टींग ट्रॅकिंगही महत्वाचे आहे. दरदिवशी जवळपास ३१००० टेस्ट असून पॉझिटिव्हीची २०% त्या आसपास यायला सुरुवात झाली आहे. अर्थात अजून कन्क्लुजनला येण्याची वेळ नाही.

मेडिकल मधील रेमडीसिव्हीरची विक्री उद्यापासून बंद 

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून रुग्णाला हा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.सौरभ राव यांनी दिली आहे. 

पुण्यात गेले काही दिवस सरसकट रेमडेसिव्हीरच्या मागणीसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आले. यामध्ये रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन आणत लोक मेडिकलमध्ये गर्दी करत आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना इंजेक्शन मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “शासकीय रुग्णालयात जर दोन रेमडेसिव्हिर वापरले जात असेल तर खासगीमध्ये त्याचे प्रमाण १००% असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात जर रुग्णालयात एखादा माणूस ॲडमिट आहे तर त्याला तिथूनच इंजेक्शन पुरवले गेले पाहिजे. त्यामुळे हे निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”. रेमडेसिव्हीरच्या मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत आहे. शासकीयमध्ये दर दोन पेशंट मागे एक रेमडेसिव्हिर तर प्रायव्हेटमध्ये मात्र १००% वापर केला जात आहे. त्यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलवर प्रश्न नाही.

Web Title: Corona virus: relief to Pune residents in 'tension'; Due to strict restrictions, the 'positive' rate has gone up from 36 to 20 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.