Corona virus : धक्कादायक! कोरोना होईल ह्या भीतीने रिक्षाचालकाची आत्महत्या ; धायरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:34 PM2020-06-23T12:34:43+5:302020-06-23T12:35:21+5:30

कॅनॉलमध्ये उडी मारून दिला जीव

Corona virus : Rickshaw driver commits suicide for fear of corona; Incident at Dhayari | Corona virus : धक्कादायक! कोरोना होईल ह्या भीतीने रिक्षाचालकाची आत्महत्या ; धायरी येथील घटना

Corona virus : धक्कादायक! कोरोना होईल ह्या भीतीने रिक्षाचालकाची आत्महत्या ; धायरी येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देरिक्षाचालकाच्या खिश्यात ठेवलेली सुसाईड नोट पाण्यात भिजल्याने त्यातील अक्षरे अस्पष्ट

पुणे : कोरोना आजार होईल ह्या भीतीने सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील रिक्षाचालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल बाबुराव खाटपे (वय: ५४, रा. बडदे चाळ , गारमाळ, धायरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठच्या सुमारास एका पुरुषाचे प्रेत लगड मळ्याच्या पाठीमागील कॅनॉल लगतच्या एका झुडुपात अडकल्याचे दिसल्याने एका नागरिकाने पोलिसांना कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कॅनॉलबाहेर प्रेत काढल्यानंतर खिश्यात सुसाईड नोट व ड्रायव्हिंग लायसन्स आढळून आल्याने  पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली.रिक्षाचालक अनिल यांच्या खिश्यात ठेवलेली सुसाईड नोट पाण्यात भिजल्याने त्यातील अक्षरे अस्पष्ट दिसत असून मला कोरोना आजार होईल व त्याच्या त्रासाने हाल होऊन मरण्यापेक्षा  मी स्वत:च आत्महत्या करून मरतो, अशा आशयाचा मजकूर लिहून त्यांनी कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून ते सायंकाळी घरातून न सांगता निघून गेल्याचे समजते आहे. दरम्यान त्यांनी आणखीन एक सुसाईड नोट घरात लिहून ठेवल्याचे त्यांच्या कुटुंबियांना नंतर आढळून आले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुस्तम शेख हे करीत आहेत.

 

Web Title: Corona virus : Rickshaw driver commits suicide for fear of corona; Incident at Dhayari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.