कोरोनाचा 'निर्दयी' खेळ ; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर २४ तासांतच आईचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:09 PM2021-04-06T20:09:17+5:302021-04-06T20:16:01+5:30

जुळ्या बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या आईचा चोवीस तासात मृत्यू झाला आहे.

Corona virus 'ruthless' game; Mother dies of corona within 24 hours of giving birth to twins | कोरोनाचा 'निर्दयी' खेळ ; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर २४ तासांतच आईचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाचा 'निर्दयी' खेळ ; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर २४ तासांतच आईचा कोरोनामुळे मृत्यू

Next

पिंपरी : जुळ्या बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या  आईचा  चोवीस तासात मृत्यू झाला आहे. वायसीएम रुग्णालयात ही घटना घडली आहे. जुळ्या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे त्याचा धोका टळला आहे. 

पिंपरी गाव येथील ही महिला होती. त्रास होऊ लागल्यामुळे ४ एप्रिलला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  दाखल करताना महिलेची ऑक्सिजन पातळी खालावली होती. त्यामुळे अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ एप्रिलला या महिलेची प्रसुती करण्यात आली.  तिने जुळ्या  मुलींना जन्म दिला. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावत गेली आणि ५ एप्रिलला सकाळी मृत्यू झाला आहे. जन्मलेल्या बाळांचे २४ तासाच्या आत छत्र हरपल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. शहरात वाढत असलेला कोरोना अजून किती बळी घेणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याची डॉक्टरांनी संगीलते आहे. 
---
प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावत असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. महिलेला वाचविण्याचे पूर्ण प्रयन्त केले पण यश आले नाही. बाळांना ऑक्सिजन देण्यात आले आहे. बाळाची  अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

आरटीपीसीआर रिपोर्ट येणे बाकी आहे. पण त्याची प्रकृती स्थिर आहे. 
पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात सध्या वीस कोरोना बाधित गरोदर महिला उपचार घेतायेत. पैकी पाच महिला आयसीयूमध्ये दाखल आहेत. 

- डॉ. विनायक पाटील - वायसीएम रुग्णालय

Web Title: Corona virus 'ruthless' game; Mother dies of corona within 24 hours of giving birth to twins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.