Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ४० ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:02 PM2020-04-10T12:02:51+5:302020-04-10T12:09:28+5:30

दररोज ३ हजार २५० थाळीचे वाटप, ५ रुपयांत थाळी 

Corona virus : The ShivBhojan Kendra started at 40 places in Pune district | Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ४० ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू 

Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ४० ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू 

Next
ठळक मुद्देमजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी यांचे हाल होऊ नये यासाठी हा निर्णयसकाळी ११ दुपारी ३ पर्यंत केंद्रे सुरू राहणार 

सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात सर्व तालुक्यात विविध ४० ठिकाणी तातडीने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या शिवभोजन केंद्रांतून दररोज ३ हजार २५० थाळीचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांकडून केवळ ५ रुपये घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात शासनाकडून केवळ तालुका स्तरावर शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती. आता शासनाने सर्व तालुक्याच्या ठिकाणी ही शिवभोजन केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर 5 रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले..
------ 
सकाळी ११ दुपारी ३ पर्यंत केंद्रे सुरू राहणार 
जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रे सकाळी ११ते दुपारी ३ या काळात सुरु राहणार आहेत. या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निजंर्तुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच शक्यतो फुड पॅकेट देण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Web Title: Corona virus : The ShivBhojan Kendra started at 40 places in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.