Corona virus : धक्कादायक! दिल्लीतून आलेले पिंपरीचे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:13 PM2020-04-02T12:13:18+5:302020-04-02T12:15:52+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी
पिंपरी: - दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 पैकी 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाग्रस्त झाले असून शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. दरम्यान आता शहरात चार पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत.
दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलिगी - ए - जमात या संघटनेच्या वतीने तबलिगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत ३२नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठविले होते, त्यांचा अहवाल आला असून त्यापैकी 2 जण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे महापालिकेतील रुग्ण संख्या 4 वर गेली आहे.
उर्वरीत १८ जणांचा शोध घेत आहोत.