Corona virus : पुणे शहरात जुलै अखेरीस कमी पडू शकतात आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 07:12 AM2020-06-14T07:12:00+5:302020-06-14T07:15:01+5:30
कोरोनामुळे रुग्णांची संख्या जुलैमध्ये वाढण्याची शक्यता.. काळजी घेण्याची आवश्यकता..
लक्ष्मण मोरे
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून शासनाने आणि पालिकेने काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. प्रशासनाने बांधलेल्या अंदाजानुसार ३१ जुलैपर्यंत शहरात तब्बल ४० हजार ९०६ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण असणार आहेत. तर, जवळपास १८ हजार ४०८ प्रत्यक्ष ऍक्टिव्ह रुग्ण असणार आहेत. पालिकेची तयारी पाहता आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स कमी पडतील असा अंदाज आहे.
शहरातील रुग्ण संख्या ९ हजारांच्या पुढे गेली आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्ण संख्या अडीच हजारांच्या पुढे आहे. पालिकेसमोर मृत्युदर कमी करण्याचेही मोठे आव्हान आहे. केंद्रीय पथकाने दिलेल्या सूचनांनुसार उपायययोजना कराव्या लागणार आहेत. पालिकेने २८ मेपासून ३१ जुलैपर्यंतच्या संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्ण, आयसोलेशन बेड्स, आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स यांचा अंदाजित अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, शहरात १५ हजार ६४७ विना ऑक्सिजन खाटा, १८४१ ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, ९२० आयसीयू बेडस आणि ४६० व्हेंटिलेटर्स उपलब्ध असतील. परंतु, त्याच वेळी आयसीयूचे ३४० बेड्स आणि १७२ व्हेंटिलेटर्सची कमतरता भासणार आहे. यासोबतच २ हजार ६०४ विना ऑक्सिजन खाटांची कमतरता भासू शकेल असा पालिकेचा अंदाज आहे.
-----------------
रुग्णांचा अंदाज
तारीख अंदाजित रुग्ण प्रत्यक्षात रुग्ण अंदाजित ऍक्टिव्ह प्रत्यक्ष
28 मे 5,317 5,851 2,258 2,294
03 जून 6,936 7,089 2,946 2,389
17 जून 10, 424 ---- 4,691 -----
30 जून 15, 612 ---- 7025 -----
15 जुलै 24, 881 ----- 11, 196 -----
31 जुलै 40, 906 ----- 18, 408 -----
=================
साधनांची आवश्यकता
तारीख साध्या खाटा ऑक्सिजन खाटा आयसीयू व्हेंटिलेटर्स
17 जून 3,987 469 235 117
30 जून 5,972 703 351 176
15 जुलै 9,517 1,120 560 280
31 जुलै 15, 647 1,841 920 460
===================
प्रत्यक्षात कमी पडू शकणारी साधने तारीख ( सध्याचा अंदाज)
तारीख अंदाजित रुग्ण प्रत्यक्षात रुग्ण अंदाजित प्रत्यक्ष ऍक्टिव्ह
28 मे 5,317 5,851 2,258 2,294
03 जून 6,936 7,089 2,946 2,389
17 जून 10, 424 ---- 4,691 -----
30 जून। 15, 612 ---- 7025 -----
15 जुलै 24, 881 ----- 11, 196 -----
31 जुलै 40, 906 ----- 18, 408 -----
=================
साधनांची आवश्यकता
तारीख साध्या खाटा ऑक्सिजन खाटा आयसीयू व्हेंटिलेटर्स
17 जून 3,987 469 235 117
30 जून 5,972 703 351 176
15 जुलै 9,517 1,120 560 280
31 जुलै 15, 647 1,841 920 460
===================
प्रत्यक्षात कमी पडू शकणारी साधने
तारीख। साध्या खाटा ऑक्सिजन खाटा आयसीयू व्हेंटिलेटर्स
17 जून 9,056 2,044 345 171
30 जून 7,071 1,810 229 112
15 जुलै 3,526 1,393 20 08
31 जुलै (-) 2,604 672 (-) 340 (-) 172 व्हेंटिलेटर्स