Corona virus : परदेशातून आलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, पुण्यात पहिला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 07:39 PM2020-06-19T19:39:41+5:302020-06-19T20:35:46+5:30

परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक क्वरंटाईन करणे बंधनकारक..

Corona virus : Violation of rules by foreign return people, first crime case filed in Pune | Corona virus : परदेशातून आलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, पुण्यात पहिला गुन्हा दाखल

Corona virus : परदेशातून आलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, पुण्यात पहिला गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसंस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार देणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करणार

पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करणे बंधनकारक आहे. असे असताना काही लोक प्रशासनाच्या आदेशाच्या पालन न करता संस्थात्मक क्वारंटाईनचे उल्लंघन करत असून, स्वत: सह इतर लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे संस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार देणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी स्पष्ट केले आहे. 
शासनाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे. असे असून सुद्धा अश्विन कुमार सिंग (वय वर्षे 31) हे दिनांक 16 जून रोजी विमानाने लंडन येथून मुंबईला आले व नंतर हांडेवाडी (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील त्यांच्या घरी परस्पर निघून गेले. 
त्या वेळी कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन त्याला समजावून सांगितले. तथापि, त्याने इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाइन होण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या आदेशावरुन संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51, महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे प्रगती उल्हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा दाखल केला असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी कळवले आहे.

Web Title: Corona virus : Violation of rules by foreign return people, first crime case filed in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.