Corona virus : लॉकडाऊनच्या काळातही ' स्वच्छतेचे दूत ' म्हणताहेत आम्ही आहोत खंबीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:00 PM2020-03-26T16:00:31+5:302020-03-26T16:08:27+5:30
फक्त नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
पुणे: शहरात घरोघरी फिरून कचरा जमा करणारे स्वच्छ संस्थेचे साडेतीन हजार कर्मचारी संचारबंदी काळातही कार्यरत आहेत. आम्ही खंबीर आहोत, आम्हाला तसेच राहण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन स्वच्छ संस्थेने केले.आहे.
कचयार्चा ताण कमी करण्यासाठी म्हणून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ संस्थेची मदत घेतली आहे. शहराच्या सर्व भागात घरोघरी फिरून हे कर्मचारी कचरा जमा करतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे महत्व लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांनी आपले काम अनेक अडचणी येत असूनही कायम ठेवले.आहे. त्यात अगदीच अपवाद वगळता खंड येऊ दिलेला नाही.
संस्थेचे पदाधिकारी हर्षद बर्डे म्हणाले, या कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा वेगळा देऊन नागरिक सहकार्य करू.शकतात. सध्या हातमोजे, कागदी टिश्यूपेपर या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. ते कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकावेत, अन्यथा कर्मचाऱ्यांना त्याचा संसर्ग होऊ.शकतो. कर्मचारीही हातमोजे वापरूनच त्यांचे काम करतात, मात्र ही काळजी नागरिकांनीही घ्यावी.
हे कर्मचारी पालिकेचे पगारी कर्मचारी नाहीत. घरांमधून मिळणारी मासिक रक्कम व संस्था देत असलेली तोकडी रक्कम हाच त्यांचा आधार आहे. त्यामुळे शक्य आहे त्या नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना काही दिवस पुरेल इतका शिधाही द्यावा असेही आवाहन संस्थेने केले आहे.
कर्मचाऱ्यांना संचारबंदीमुळे प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. संस्थेने त्यांना ओळखपत्र दिली आहेत. अडचणी येत असूनही ते त्यांच्या कामाचे महत्व लक्षात घेऊन कामावर येत आहेत. नागरिकांनाही त्यांना सहकार्य करावे असे बर्डे यांनी सांगितले.