Corona Virus : चिंताजनक ! पुणे शहरात बुधवारी तब्बल १३५२ नवे कोरोनाबाधित; १३ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:03 PM2021-03-10T20:03:21+5:302021-03-10T20:08:41+5:30
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी बुधवारी ३६४ जणांची प्रकृती चिंताजनक
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच आहे. बुधवारी दिवसभरात १३५२ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ६४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३६४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ७ हजार ७१९ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी बुधवारी ३६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ७२१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९१० झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ६४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९८, ८९२.झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ११, ५२१ झाली आहे. दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ७२१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली आहे.