Corona virus : चिंताजनक! पुणे जिल्ह्यात रविवारी तब्बल 675 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 15 हजार 679
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:11 AM2020-06-22T11:11:51+5:302020-06-22T11:13:40+5:30
गेल्या काही दिवसांत पुणे शहर ,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे..
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. रविवार (दि.21) रोजी एकाच दिवसांत 675 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली.तर 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 679 वर जाऊन पोहचली आहे. तर एकूण मृत्यू 592 झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये पुणे शहर आघाडीवर असून, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात देखील कोरोना बाधित रूग्णांच्या वाढीचा वेग कायम आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना रूग्ण संख्या मात्र कमी होताना दिसत नाही.
---
एकूण बाधित रूग्ण : 15679
पुणे शहर : 12154
पिंपरी चिंचवड : 1418
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 1284
मृत्यु : 592