कोरोना योद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:23+5:302021-08-24T04:14:23+5:30
विजय अल्हाट यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांच्यावर घरीच प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु त्यांना जास्त ...
विजय अल्हाट यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांच्यावर घरीच प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र कोरोनाशी झुंज देत (शनिवार, दि. २१) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्हाट हे १९९५ पासून ग्रामपंचायत विठ्ठलवाडी येथे शिपाई या पदावर कार्यरत होते.सतत हसतमुख दिसणारा चेहरा व प्रामाणिकपणे काम करणारे म्हणून ओळख असणारे विजय अल्हाट यांनी गावात दोन वर्षे कोरोनाच्या संकटकाळात कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सून, मुलगी, जावई, भाऊ, ३ बहिणी असा परिवार आहे. कॅप्टन माजी सरपंच लोभाजी अल्हाट यांचे ते बंधू होत.
230821\1740-img-20210823-wa0010.jpg
कोरोनामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे निधन