कोरोना योद्धे सुरक्षित राहिले पाहिजेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:45+5:302021-04-22T04:11:45+5:30
स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने आर्थिक गुन्हे शाखा व सायबर क्राइममध्ये काम करणाऱ्या सुमारे २०० पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना ...
स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने आर्थिक गुन्हे शाखा व सायबर क्राइममध्ये काम करणाऱ्या सुमारे २०० पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की पोलीस बांधवांमुळेच आपण सर्वजण घरी सुरक्षित आहोत. आपल्याला फक्त घरी बसून त्यांना सहकार्य करायचे आहे. कोरोनाकाळात पोलिसांनी केलेले कार्य देवदूतापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजीराव पवार, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पीएचमेडिकलचे डॉ. हेमंत धोका, अॅड गौरी भटेवरा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पगारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी संचेती ट्रस्टचे आभार मानले. पोलीस काम करीत असताना चांगले नागरिक नेहमीच पोलिसांच्या पाठीशी उभे असतात. कोरोनाकाळात नागरिकांनी घरी राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. शिवाजीराव पवार यांनी केले.
फोटो: अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे कोरोना टेस्ट करताना. सोबत डावीकडून अभय संचेती, गौरी भटेवरा, सुभाष पगारिया