कोरोनामुळे अभ्यासक्रम, अध्यापन, रोजगारही बदलणार; ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:03 AM2020-05-20T03:03:03+5:302020-05-20T05:36:09+5:30

कोविड बॅच म्हणून विद्यार्थ्यांवर ठपका बसू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सामोरे जावे, असा सूर ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुण्यातील नामांकित शैैक्षणिक संस्थांच्या प्रमुख्यांशी झालेल्या चर्चेतून मंगळवारी उमटला.

Corona will also change the curriculum, teaching, employment; The role of education experts in the webinar organized by Lokmat | कोरोनामुळे अभ्यासक्रम, अध्यापन, रोजगारही बदलणार; ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञांनी मांडली भूमिका

कोरोनामुळे अभ्यासक्रम, अध्यापन, रोजगारही बदलणार; ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञांनी मांडली भूमिका

Next

पुणे : कोविडनंतर सुरू होणाऱ्या शैैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असा विश्वास पालकांच्या मनात निर्माण करावा लागणार आहे. आॅनलाइन शिक्षणासाठी अत्याधुनिक ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे. परदेशात जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केलेल्या भारतीय विद्यापीठांमध्येच शिक्षण घ्यावे लागेल. कोविड बॅच म्हणून विद्यार्थ्यांवर ठपका बसू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सामोरे जावे, असा सूर ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुण्यातील नामांकित शैैक्षणिक संस्थांच्या प्रमुख्यांशी झालेल्या चर्चेतून मंगळवारी उमटला.
‘लोकमत’तर्फे ‘कोविडनंतरच्या जगात उच्च शिक्षण - आव्हाने संधी व कल’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजित कदम, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड, सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार सहभागी झाले होते.

अंतिम वर्षाची परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून दोन किंवा तीन शिफ्टमध्ये. विद्यार्थ्यांची घराजवळील महाविद्यालयात परीक्षा देणे शक्य
शिक्षकांना ‘ब्लेंडेड’ पद्धतीने शिकवावे लागेल. विद्यार्थी काही भाग वर्गात तर काही भाग आॅनलाइन पद्धतीने घरी किंवा वसतिगृहात थांबून शिकतील.
-नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

आॅनलाईन शिक्षणातही शिक्षक-विद्यार्थी संवाद वाढावा
शिक्षकांना हवे अद्ययावत ज्ञान; अन्यथा काही शिक्षक बाहेर फेकले जातील.
- डॉ. पी. डी. पाटील,
कुलगुरू, डी. वाय. पाटील विद्यापीठ


विद्यार्थ्यांनी आता परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक करार केलेल्या भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घ्यायला हवे.
सर्वच शिक्षण संस्थांनी स्वच्छता, फिजिकल डिस्टन्सिंग, वर्गातील विद्यार्थ्यांच्या बैैठक व्यवस्थेबाबत एकत्र येऊन नियमावली तयार
करायला हवी.
- डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका व प्र-कुलगुरू,
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ

आॅनलाइन अभ्यासक्रमांचे मूल्यांकन नॅक, एनबीए धर्तीवर व्हावे
मेडिकल व इंजिनिअरिंग आॅनलाईन शिक्षणासाठी मार्ग शोधावे लागतील.
परीक्षांबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली जाईल.
- डॉ. विश्वजित कदम,
सचिव व प्र-कुलगुरू,
भारती विद्यापीठ

पूर्ण कंपनी डिजिटल करण्यासंदर्भातील डिजिटल ट्रान्फॉर्मेशन मॅनेजर, आॅनलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट अशा स्वरूपाचे काम करणारे मनुष्यबळ लागेल.
गेमिंग क्षेत्रातील संधी वाढेल. तसेच फायनान्स रिटेल, कॉन्टम कंप्युटिंग, डेटा सायन्स आदी क्षेत्रांतही नवीन रोजगार निर्माण होतील.
- डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू,
सिम्बायोसिस कौशल्य व
व्यावसायिक विद्यापीठ

देशात येणाºया नवीन कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळासाठी शिक्षण
विद्यार्थी, शिक्षणसंस्थांना वेग्ळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय द्यावा. शासनाने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला पाहिजे.
- डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ

- लोकमत यू-ट्यूब चॅनेलवर हा वेबिनार पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Web Title: Corona will also change the curriculum, teaching, employment; The role of education experts in the webinar organized by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.