हाँटस्पाँट गावातच होणार कोरोनाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:50+5:302021-03-18T04:11:50+5:30
पुरंदर तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट असलेल्या गावातील जेष्ठ नागरीकांचे व हाय रिस्क तसेच लो रिस्क व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार ...
पुरंदर तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट असलेल्या गावातील जेष्ठ नागरीकांचे व हाय रिस्क तसेच लो रिस्क व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात आरोग्याच्या प्राथमिक तपासण्या करून संशयीत रुग्णांची त्यांच्याच गावात कोरोना तपासणी करण्यत येणार आहे.
पुरंदर तालुक्यातील पिंपरे (खुर्द), गुळूंचे, मावडी क.प, कोळविहिरे, पांडेश्वर, साकुर्डे व सोनोरी ही गावे कोरोनाची हाँटस्पाँट झाली आहेत. आँक्सीजन, तापमान, रक्तदाब, मधुमेह, कँन्सर, अस्थमा इत्यादी तपासणी कराव्यात असे कार्यलयीन आदेश पुरंदर पंचायत समितीच्या वतीने आज काढण्यात आले.
या तपासण्या केल्यानंतर संशयीत रुग्णांची त्याच गावात अँन्टीजन तपासणी करावी व दैनंदिन तपासणी अहवाल विहीत नमुन्यात सादर करावेत, असे आदेश आज तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी संबंधित कोरोनाचे हाँटस्पाँट गावातील ग्रामसेवक व तलाठ्यांना काढले.