कोरोना यमराजाने फूल देऊन केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:49+5:302021-04-30T04:13:49+5:30

हे चित्र होते सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ आणि निमित्त होते कोरोनाचे नियम पाळण्याविषयच्या जनजागृतीचे. पुणे महापालिकेचे सिंहगड रोड क्षेत्रीय ...

Corona Yamaraja welcomed with flowers | कोरोना यमराजाने फूल देऊन केले स्वागत

कोरोना यमराजाने फूल देऊन केले स्वागत

Next

हे चित्र होते सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ आणि निमित्त होते कोरोनाचे नियम पाळण्याविषयच्या जनजागृतीचे. पुणे महापालिकेचे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने सध्या बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याबरोबरच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज हा वेगळा प्रयोग करण्यात आला. या वेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त जयश्री काटकर-बोराडे, उपअभियंता संभाजी खोत, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आसाराम काकडे, वैद्यकीय आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड, आरोग्य निरीक्षक संतोष बाईक यांच्यासह मुकदाम उपस्थित होते.

या वेळी सहायक आयुक्त बोराडे म्हणाल्या, विनाकारण बाहेर फिरणे हे सध्या अत्यंत जोखमीचे आहे. कोरोनाची लागण झाल्यास बेड मिळण्यापासून ऑक्सिजन, इंजेक्शन मिळेपर्यंत अनेक अडचणी येतात. त्यामुळे रु्ग्णांचे हाल होतातच; मात्र रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळीने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बाहेर पडणे म्हणजे यमराजाच्या भेटीला जाण्यासारखेच आहेच. त्यामुळे आम्ही प्रतीकात्मक यमराज बनवून त्याव्दारे नागरिकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. गर्दीच्या ठिकाणी असा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. गुलाबाच्या फुलांबरोबर दंडाचा बडगाही उगारण्यात येणार आहे.

--

चौकट

--

पोलिसांचा केला सत्कार

लोकांनी बाहेर पडू नये. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या सिंहगड रोड पोलीस व वाहतूक पोलिसांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास गेव्हारे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, हवलदार गेव्हारे आदी उपस्थित होते.

---

फोटो

टी ग्रामीण- फोटो- २९ सिंहगड रोड पोलीस

महापालिकेच्या वतीने

Web Title: Corona Yamaraja welcomed with flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.