Pune Corona News: शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण होतंय कमी; गुरूवारी २८२ नवे रुग्ण तर १२२ जणांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:39 PM2021-08-26T18:39:47+5:302021-08-26T18:44:19+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजाराच्या वर कायम असून, आज यात २०० ने वाढ झाली.
पुणे : शहरात गुरूवारी २८२ कोरोनाबाधित आढळून आले असून, २११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार २७८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजाराच्या वर कायम असून, आज यात २०० ने वाढ झाली असून, सद्यस्थितीला शहरात २ हजार २२२ सक्रिय रूग्ण शहरात आहेत. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१० इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७९ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३० लाख ९२ हजार ७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९४ हजार ४६७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८३ हजार ३४३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९०२ जणांचा मृत्यू झाला आहे.