चार दिवसांपासून कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:54+5:302021-04-23T04:11:54+5:30
पुणे : शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे़ गुरूवारीही दिवसभरात ४ हजार ...
पुणे : शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे़ गुरूवारीही दिवसभरात ४ हजार ८५१ कोरोनामुक्त झाले आहे. ४ हजार ५३९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात २२ हजार २७७ जणांची तपासणी केली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २०.३७ टक्के इतकी आहे़
दरम्यान आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजे ८० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २४ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़६३ टक्के इतका आहे. कोरोनाबातिधांची वाढती संख्येनुसार शहरातील मृत्यूदर कमी होत असला तरी, गेल्या दहा दिवसात शहरातील कोरोनाबाधितांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार २११ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून १ हजार ३१३ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत १९ लाख ६८ हजार ५१४ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ३ लाख ८७ हजार ३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख २९ हजार १४८ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५१ हजार ५५ इतकी झाली आहे़