कोरोनाच्या अँटिजन चाचणीचा घाेटाळा; पुण्यात ३ डाॅक्टरांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 06:14 AM2023-11-25T06:14:45+5:302023-11-25T06:15:27+5:30

गुरुवारी रात्री उशिरा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नाेंदवण्यात आला. 

Corona's antigen test debacle; Crime against 3 doctors in Pune | कोरोनाच्या अँटिजन चाचणीचा घाेटाळा; पुण्यात ३ डाॅक्टरांवर गुन्हा

कोरोनाच्या अँटिजन चाचणीचा घाेटाळा; पुण्यात ३ डाॅक्टरांवर गुन्हा

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : काेराेना काळात महापालिकेच्या दवाखान्यात झटपट काेराेना चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साडेअठरा हजार अँटिजन टेस्टिंग किटची खासगीत विक्री केली. तसेच साडेअकरा हजार नागरिकांच्या बाेगस नाेंदी करत लाखाेंचा घाेटाळा केल्याचा प्रकार सर्वप्रथम ‘लाेकमत’ने उजेडात आणला. त्याची गंभीर दखल घेत अखेर प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत तीन डाॅक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे 

पुणे शहराचे तत्कालीन आराेग्यप्रमुख डाॅ. आशिष भारती (सध्या नियुक्ती आराेग्य सेवा सहायक संचालक, मुंबई) यांच्यासह तीन डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नाेंदवण्यात आला. 

असा कळला घोटाळा
डाॅ. भारती यांच्यासह वारजे कर्वेनगरच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील कै. अरविंद बारटक्के, स्वॅब सेंटरचे प्रमुख डॉ. हृषिकेश गारडी यांच्याविरुद्ध फसवणूक व इतर कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला हाेता.

Web Title: Corona's antigen test debacle; Crime against 3 doctors in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.