शिवणे उत्तमनगर येथे कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:42+5:302021-04-10T04:09:42+5:30

कोविडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र देशभर दिसून येत आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा असून, पुढील काही दिवस लस ...

Corona's havoc at Shivne Uttamnagar | शिवणे उत्तमनगर येथे कोरोनाचा कहर

शिवणे उत्तमनगर येथे कोरोनाचा कहर

Next

कोविडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र देशभर दिसून येत आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा असून, पुढील काही दिवस लस उपलब्ध होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ह्यांनी दिली आहे.

लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज असताना लसच उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखणार हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

काल सर्व राज्यांना जाहीर झालेल्या लसीकरणाच्या उपलब्धतेवरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करण्यात आले.

शिवणे उत्तमनगर गावामध्ये वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे डॉक्टर म्हाळुंगे यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सध्या ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले तरच कोरोनाचा होणारा प्रसार थांबू शकेल. ज्या ठिकाणी एका वेळी जादा रुग्ण आढळतील तिथे छोटे छोटे कंटेन्मेंट झोन करण्यात यावे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याचे प्रमाण कमी होऊन कोरोनाचा प्रसार थांबेल.

शनिवार आणि रविवारी शासनाने ठेवलेल्या संपूर्ण लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी मदत मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: Corona's havoc at Shivne Uttamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.