कोरोनाला पळवण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:39+5:302021-01-02T04:10:39+5:30
--------- आरोग्य सेनेचा कार्यक्रम साजरा पुणे: भारतीय संस्कृतीने वैदिक धर्माबरोबरच बौद्ध, जैन, ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, पारशी, शीख अशा सर्व ...
---------
आरोग्य सेनेचा कार्यक्रम साजरा
पुणे: भारतीय संस्कृतीने वैदिक धर्माबरोबरच बौद्ध, जैन, ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, पारशी, शीख अशा सर्व धर्म विचारांना सामावून घेतले. प्राचीन भारतीय संस्कृती सर्वांना सामावून घेणारी असल्याने नव्या पिढीने ती आत्मसात करावी, असे मत डॉ अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. सेवा संघाच्या अनाथ आश्रमात आरोग्य सेनेतर्फे आयोजित ख्रिसमस ते नवीन वर्षारंभ सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बुधा बुऱ्हाडे, वर्षा गुप्ते, डॉ नितीन केतकर उपस्थित होते.
-----------------
शिंपी वधु-वर सूची प्रसिद्ध
पुणे : समस्त शिंपी समाजाच्यावतीने कोरोना काळात दहा ऑनलाईन वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले होते. माजी महापौर अंकुश काकडे यांच्या हस्ते मेळाव्यांच्या छापील सुचीचे प्रकाशन करण्यात आले. शिंपी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र होमकर, सचिव राजेंद्र भुतकर, कोषाध्यक्ष राजेंद्र पगारे, शिरीष मोहिते, युवराज गाढवे, चंद्रशेखर हलवाई, प्रशांत भोंडवे, राजश्री कालेकर, श्रद्धा ढवळे आदी यावेळी उपस्थित होते.
------------------
मराठा तरुणांना लाभ देणार
पुणे : मराठा तरुणांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मराठा बिझनेस असोसिएशन हे व्यासपीठाची स्थापन केल्याचे उद्योजक संदीप पाटील यांनी सांगितले. दिली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला तरुण मराठा व्यासायिकांनी एकत्र येत मराठा बिझिनेस असोसिएशनची स्थापना केली. यावेळी उद्योजक माऊली टिंगरे, अरविंद फाजगे पाटील, गणपती सावंत, माधव जगताप, विजय गुंजाळ, किरण नलावडे, आदी उपस्थित होते.