कोरोनाबाधितांना गृह विलगीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:53+5:302021-03-07T04:10:53+5:30

बारामती : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यापुढे आता बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. तसेच कोणत्याही खासगी ...

Coronation victims do not have home segregation | कोरोनाबाधितांना गृह विलगीकरण नाही

कोरोनाबाधितांना गृह विलगीकरण नाही

Next

बारामती : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यापुढे आता बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. तसेच कोणत्याही खासगी रुग्णालयाला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये नोंद केल्याशिवाय अथवा वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या शिफारसपत्र असल्याशिवाय कोरोना रुग्ण दाखल करून घेता येणार नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे एक कोविड केअर सेंटर सुरू असून नटराज नाट्य कला मंडळ यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे आणखी दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.

बारामती तालुक्यात कोरोनाच्या वाढत असलेल्या प्रादुभार्वाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना बाबतची आढावा बैठक शनिवारी (दि.६) पार पडली. यावेळी ते बोलत होते. या वेळी नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रुग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे, पोलीस विभागातील अधिकारी, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, खासगी शिकवणी वर्ग, लग्न कार्यालय व सभागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकांकडून तपासणी केली जाणार आहे व शासन व प्रशासन यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहनही पाटील यांनी केले.

कोविड लसीकरणाची माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे म्हणाले की, ८ मार्च २०२१ पासून सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सर्व ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. महिला हॉस्पिटल, बारामती व ग्रामीण रुग्णालय, सुपे येथे सोमवार ते शनिवार या दिवशी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. सदरचे लसीकरण हे विनामूल्य आहे. या लसीकरणासाठी प्रथम ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून यानंतर ४५ ते ६० दरम्यान वय असलेल्या कोमाबिर्ड नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोविड लस ही सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी डॉ. खोमणे यांनी केले.

Web Title: Coronation victims do not have home segregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.