CoronaVirus: पुणे कोरोना हॉटस्पॉट; रुग्ण संख्या ५८९ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:49 AM2020-04-19T03:49:42+5:302020-04-19T03:51:49+5:30

विभागात ६४६ बाधित; एकूण ५२ मृत्यू

CoronaVirus 589 corona patients in Pune | CoronaVirus: पुणे कोरोना हॉटस्पॉट; रुग्ण संख्या ५८९ वर

CoronaVirus: पुणे कोरोना हॉटस्पॉट; रुग्ण संख्या ५८९ वर

Next

पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या शनिवारी संध्याकाळी सव्वा सातपर्यंत ६४६ वर पोहोचली; तर सक्रिय म्हणजे सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या ५२० असून ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२ रुग्ण गंभीर असून, उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.

विभागात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात ५८९ इतके आहेत. विभागातील सर्वाधिक ४९ रुग्णांचा मृत्यूही पुण्यात झाला आहे. सातारा जिल्ह्यात ११ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात १४ बाधीत रुग्ण असून एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात २६ तर कोल्हापूर जिल्ह्यात ६ बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यत पुणे विभागामध्ये एकूण आठ हजार १८८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सात हजार ६०० चा अहवाल प्राप्त झाला आहे. ५८८ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी सहा हजार ९०९ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ६४६ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
दरम्यान, आजपर्य$ंत विभागातील ३९ लाख ३३ हजार ४९६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत एक कोटी ४७ लाख ८२ हजार ८१२ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ८११ व्यक्तींची अधिक तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

पोलिसाला लागण
पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आणखी एका महिलेचे रिपोर्टही शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ४० वर पोहचली आहे. तर, शहरातील ५४ जणांना शुक्रवारी रात्रीपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Web Title: CoronaVirus 589 corona patients in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.