coronavirus : काेराेनाचा पर्यटनाला फटका ; व्यावसायिकांचे दीडशे काेटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:56 PM2020-03-11T15:56:31+5:302020-03-11T16:03:28+5:30

काेराेना राेगाचा फटका आता पर्यटन व्यवसायाला बसत असून पर्यटन व्यवसायिकांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत आहे.

coronavirus: affect of corona virus on tourism rsg | coronavirus : काेराेनाचा पर्यटनाला फटका ; व्यावसायिकांचे दीडशे काेटींचे नुकसान

coronavirus : काेराेनाचा पर्यटनाला फटका ; व्यावसायिकांचे दीडशे काेटींचे नुकसान

Next

पुणे : काेराेनाचा फटका हळूहळू विविध व्यवसायांना हाेत असल्याचे समाेर येत आहे. काेराेनाची सुरुवात चीनमधून झाल्याने तसेच त्याचा प्रसार पर्यटकांच्या माध्यमातून इतर देशांमध्ये झाल्याने आता या विषाणूचा पर्यटनावर परिणाम हाेत असल्याचे चित्र आहे. पर्यटक आपल्या सहली रद्द करत असल्याने ट्रॅव्हन कंपन्यांना तब्बल 150 काेंटीचे नुकसान हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पुण्यातील पर्यटकांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 

पुण्यात काेराेनाचे पाच रुग्ण आढळले असून आणखी 10 संशयित रुग्ण असल्याचे समाेर आले आहेत. या रुग्णांचे रिपाेर्ट अद्याप आलेले नाहीत. दुबईवरुन पुण्यात आलेल्या दांपत्याला सर्वप्रथम काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना याची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. काेराेना पसरण्याची सुरुवात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे झाल्याने देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आता माेठ्याप्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. 

काेराेनाच्या धास्तीमुळे विदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तसेच ज्यांनी परदेशवारीचे प्लॅन केले हाेते, ते आता रद्द करत आहेत. त्यामुळे याचा फटका पर्यटन कंपन्यांना बसत आहे. पुणे शहरातून दरवर्षी 40 ते 50 हजार पुणेकर देश आणि विदेशात प्रवास करत असतात. एका पर्यटकाच्या मागे साधारण 70 हजारांपर्यंत खर्च येताे. त्यामुळे सद्या पर्यटन व्यवसायिकांचे साधारण 150 काेटी रुपयांचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. 

पर्यटक व्यावसायिक म्हणाले, आम्ही पर्यटकांचे 2 ते 4 महिने आधी बुकिंग करतो. बुकिंग करतानाच कॅनसलेशनचे नियम ठरलेले आहेत.15 दिवस आधी बुकींग रद्द केले तर काहीच पैसे मिळत नाही. विमान कंपन्या आम्हाला कॅनसलेशन लावतात. सध्या कोरोनाचा भीतीमुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद आहेत. तर, देशांतर्गत उड्डाण सुरू आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. काेराेनाच्या भीतीमुळे नागरिक देशांतर्गत प्रवास करण्याचे टाळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

Web Title: coronavirus: affect of corona virus on tourism rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.