Coronavirus : सुपर स्प्रेडर’ आणतील दुसरी लाट, आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 05:31 PM2020-11-14T17:31:19+5:302020-11-14T17:31:53+5:30
Coronavirus in Pune News : राज्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे - जनसंपर्क अधिक असलेले विविध व्यावसायिक, घरगुती सेवा पुरविणारे कामगार, मजूर, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय कर्मचारी सुपर स्प्रेडर आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्यामध्ये त्यांची भुमिका महत्वाची आहे. त्यामुळे अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळा तपासणी प्राधान्याने करावी, अशा सुचना आरोग्य विभागाने यंत्रणांना दिल्या आहेत. तसेच दुसºया लाटे शक्यता गृहित धरून विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद, महापालिका व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांश्ी सतत संपर्क येणाºया व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होतो, हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. दुसरी लाट येण्यामध्येही अशा सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भुमिका बजावू शकतात, असे परिपत्रकात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. या व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा वेग रोखता येऊ शकतो. त्यासाठी दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान ५० टक्के नमुने हे या गटातीलल व्यक्तींचे असावे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हे आहेत सुपर स्प्रेडर
किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक, वेटर्स, विविध घरगुती सेवा पुरविणारे कर्मचारी, वाहतुक व्यवसायातील माल वाहतुक करणारे ट्रक चालक, टेम्पो चालक, रिक्षाचालक, हमाली, रंगकाम, बांधकाम आदी कामे करणारे मजुर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील चालक, वाहक, व इतर कर्मचारी, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड आदी.