coronavirus : कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी शहरात कोविड केअर केंद्राची उभारणी - नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 04:18 PM2020-04-12T16:18:54+5:302020-04-12T16:19:04+5:30

केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुणे शहराकरिता कोवीड १९ करिता पुणे महानगरपालिकेमार्फत कोवीड १९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांच्या कोवीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

coronavirus: Construction of Covid Care Center in the city for the treatment of corona positive patient - Naval Kishore Ram | coronavirus : कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी शहरात कोविड केअर केंद्राची उभारणी - नवल किशोर राम

coronavirus : कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी शहरात कोविड केअर केंद्राची उभारणी - नवल किशोर राम

googlenewsNext

पुणे - शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोवीड-१९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी (कोवीड केअर सेंटर)डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 
याबाबत राम यांनी सांगितले राज्याचे मुख्य सचिवांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. यात त्यांनी तातडीने केंद्र सरकारच्या आरोग्य व स्वास्थ्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुणे शहराकरिता कोवीड १९ करिता पुणे महानगरपालिकेमार्फत कोवीड १९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांच्या कोवीड केअर सेंटर,(डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल)च्या उपाययोजनांबाबत अंतर्गत शासकीय व खाजगी हॉस्पिटलमार्फत खालील प्रमाणे उपाययोजना व नियोजन करण्यात आलेले आहे.
पुणे महानगरपालिका कोवीड केअर सेंटर-
৭) ढोले पाटील रोड- नगर रोड नगररोड-वडगावशेरी संगमवाडी (रक्षक नगर क्रीडा संकुल, खराडी) -डॉ.स्वाती घनवट ९५५२५३४४९६
(2) घोले रोड-शिवाजीनगर कै.द्रौपदाबाई कोथरुड बावधन औंध-बाणेर हॉस्पिटल,बोपोडी -८८०६६६८७४७ डॉ.स्वाती बढीये
३)- सहकारनगर-धनकवडी, 
सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर , कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे
दवाखाना,वडगाव धायरी,
९८२२४११३७१
डॉ.शुभांगी शहा
(४) हडपसर-मुंढवा कोंढवा-येवलेवाडी वानवडी-रामटेकडी, कै.नामदेवराव शिवरकर प्रसुतिगृह,वानवडी कै.मिनाताई ठाकरे प्रसुतिगृह,कोंढवा, डॉ.जयंत कांबळे ९६८९९१८८४७, डॉ.रुचिता फाटक ९७६५३९०२०२
(५)कसबा-विश्रामबाग वाडा, भवानी पेठ बिबवेवाडी (सेंटरचे नाव- सणस मैदान होस्टेल -७२७६०२७४२१ डॉ.अमोल राठोड
या ५ कोवीड केअर सेंटरवर एकूण ३७५ खाटांची सोय करण्यात आली आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी कळविले आहे.

पुणे शहरातील कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांसाठी पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार पाच भागात कोविड केअर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ढोले पाटील रोड- नगररोड- वडगावशेरी- संगमवाडी या परिसरातील नागरिकांसाठी रक्षक नगर क्रीडा संकुल, खराडी येथे 70 खाटांची, घोलेराडे- शिवाजीनगर-कोथरुड- बावधन-औंध-बाणेर या परिसरातील नागरिकांसाठी कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे 50 खाटांची, सहकारनगर- धनकवडी- सिंहगड रोड- वारजे- कर्वेनगर या परिसरातील नागरिकांसाठी कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना, वडगाव धायरी येथे 60 खाटांची, हडपसर- मुंढवा-कोंढवा- येवलेवाडी- वानवडी- रामटेकडी या परिसरातील नागरिकांसाठी कै. नामदेव शिवरकर प्रसुतीगृह वानवडी व कै. मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह कोंढवा येथे प्रत्येकी 10 खाटांची व्यवस्था आणि कसबा-विश्रामबागवाडा- भवानीपेठ-बिबवेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी सणस मैदान हॉस्टेल येथे 175 खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कोणत्याही नागरिकाला सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरित या कोविड केअर केद्रांत तपासणी करीता जावे, असे आवाहनही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: coronavirus: Construction of Covid Care Center in the city for the treatment of corona positive patient - Naval Kishore Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.