Coronavirus: पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला दहावर; अमेरिकेहून आलेल्या तरुणाचा रिपोर्ट ' पॉझिटिव्ह '
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:33 PM2020-03-13T16:33:03+5:302020-03-13T17:13:44+5:30
Coronavirus तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता..
पुणे : जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांची झोप उडवली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत चालली असून हा आकडा शुक्रवारी नऊवरून दहावर पोहचला आहे. नुकत्याच अमेरिकेहून आलेल्या एका तरुणाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. जगभ्रमंती करून आलेल्या एका दाम्पत्यासह त्याच्या मुलीला आणि या दाम्पत्याला मुंबईहुन पुण्यात आणलेल्या कॅब चालकाला कोरोनाची बाधा झालेली आहे. यासोबतच एका प्रवाशामध्ये सुद्धा कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्ण कोरोनाबधित आहेत. यामध्ये नुकत्याच अमेरिकेहून आलेल्या एका रुग्णाची भर गुरुवारी पडली.
पुण्यात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते. शुक्रवारी आणखी एका तरुणाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेहून पुण्यात आला आहे. या तरुणाचे वय 22 ते 25 च्या दरम्यान असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.या तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता. त्याच्या घशातील द्रवाची तपासणी करून घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता. त्याच्या घशातील द्रवाची तपासणी करून घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
५०० बेड तयार , त्यापैकी ३७० पुणे महापालिका व १४० पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात
आज पहाटे आलेल्या स्पाइस जेटच्या विमानामधून त्यात सात देशामधला एकही नागरिक आला नाही.त्यामध्ये एक महिला जिच्यासोबत एक वषार्चा मुलगा आहे. ती दुबईतून आली आहे. त्या महिला सांगली येथील आहे. तिला नायडू रुग्णालयात निगराणीखाली ठेवले आहे. रिपोर्ट येणे बाकी आहे.जास्त दराने मास्क किंवा सॅनिटायझर विकेल त्या विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा जास्तीचा साठा करू नये. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येईल. शुक्रवार पर्यंत ७०० व्यक्तींना तपासले आहे. २३३ नमुने तपासले आहेत.