coronavirus: कोरोना तपासणी एक तासात; पुण्यातील माय लॅबची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:55 AM2020-07-08T05:55:50+5:302020-07-08T05:56:16+5:30
‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ या मशिनचे लोकार्पण सिरम इन्स्टिट्युटमध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, माय लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, शैलेंद्र कवडे, सुजित जैन आदी उपस्थित होते.
पुणे : कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली विविध उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच भलीमोठी प्रयोगशाळा आता इतिहासजमा होणार आहे. पुण्यातील माय लॅब सोल्युशन या कंपनीने एका छोट्या मशीनमध्येच संपूर्ण प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. नमुना मशिनमध्ये ठेवल्यानंतर तासाभरातच त्याचा अहवाल मिळणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नसून अत्यंत कमी जागा व मनुष्यबळातही हे शक्य होणार आहे.
‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ या मशिनचे लोकार्पण सिरम इन्स्टिट्युटमध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, माय लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, शैलेंद्र कवडे, सुजित जैन आदी उपस्थित होते. ‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ ही मशीन केवळ १२ चौरस फुट एवढ्या कमी जागेत ठेवता येते. ही मशिन कुठेही नेता येत असल्याने चाचण्यांचा वेग वाढू शकतो. मानवी हस्तक्षेप नसल्याने अचुकता असेल.