Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 05:08 PM2020-03-11T17:08:28+5:302020-03-11T17:10:13+5:30
देहूतील बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे.
देहूगाव : देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील काळोखे मळ्यातील दाम्पत्य कोरोना व्हायरसचे संशयितांना बुधवारी सकाळी पुण्यातील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. प्राथमिक तपासणीनंतर कोरोना संदभार्तील लक्षणे आढूळन न आल्याने घरी पाठविण्यात आले आहे. देहूतील संत तुकाराम बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे.
देहूगाव येथील काळोखे मळ्यातील एक दाम्पत्य व त्यांची दोन मुले २१ फेब्रुवारीला एका खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून दुबईला गेले होते. ते २७ फेब्रुवारीला घरी परतले. त्यांच्या पत्नीला मंगळवारी खोकल्याच्या त्रास होऊ लागल्याने ते माळीनगर येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. तेथे त्यांनी डॉक्टरांना नुकतेच दुबई टुर करून परत आल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देहूला कळविले. त्यांनी ही माहिती देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या रुग्णालयाला कळविली. तेथील वैद्यकीय अधिकारी यामिनी आडबे यांनी तातडीने संशयीताच्या घरी भेट दिली. त्यांनी संबधीत दाम्पत्यांना व त्यांच्या मुलांना पुणे येथील नायडू रुग्णालयात जाण्यास सांगितले व त्यानुसार संबधीत दाम्पत्य रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक तपासणी केली. त्यानुसार त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचे कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना घरी पाठविल आहे. पुढील तीन ते चार दिवस काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यानच्या काळात तुकाराम बीजे निमित्ताने देहूत आलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनीही त्यांच्या घरी भेट दिली असून जर त्यांचे नमुने सकारात्मक आले तर घर व परिसराचे निजंतुर्कीकरण करणार असल्याचे सांगितले. तसेच संबंधित कुटुंबातील आठ लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली.