CoronaVirus: संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून कर्फ्यू लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 12:27 AM2020-04-20T00:27:46+5:302020-04-20T00:30:06+5:30

७ दिवस कडक अंमलबजावणी; केवळ १० ते २ जीवनावश्यक दुकाने उघडी

CoronaVirus Curfew imposed in Pune and Pimpri Chinchwad from today | CoronaVirus: संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून कर्फ्यू लागू

CoronaVirus: संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून कर्फ्यू लागू

Next

पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस दलाकडून संपूर्ण पुणे शहरात प्रथम सोमवारपासून कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे़ या कर्फ्युमध्ये केवळ सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे़ 
अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते़ पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अगोदरच कर्फ्युची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तरीही कोरोनाची लागण झालेले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात मध्यरात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात येत आहे.

शहरात अनेक जण सकाळी हातात पिशवी घेऊन फिरायला बाहेर पडतात़ दुध, किराणा खरेदीचा बहाणा करतात़ त्यांनाही अडविण्यात येणार आहे़ सकाळी १० वाजल्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूची विक्री करता येणार नाही़ जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सवलत देण्यात येणार आहे़ यावेळेनंतर शहरात कोणतीही दुकाने उघडी राहणार नाहीत़ पुणे शहरात या कर्फ्युची पुढील ७ दिवस कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ लोकांनी घरातच राहून पोलिसांना सहकार्य करावे़ विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.
 
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनीही असेच आदेश काढले आहेत़ संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्फ्युची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वृत्तपत्रे, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी मुख्य रस्त्यांवरुन वाहनांना जिल्ह्यात जाण्यास व येण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणाºया वाहनांनी महामार्गाचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनीही असेच आदेश काढले आहेत़ संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Web Title: CoronaVirus Curfew imposed in Pune and Pimpri Chinchwad from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.