मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांपैकी ६८ टक्के रुग्ण अन्य आजाराने ग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:43+5:302021-06-19T04:08:43+5:30

निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरातील एकूण व्यक्तींपैकी सुमारे ६८ टक्के रुग्ण प्रथमपासूनच अन्य ...

Of the coronavirus deaths, 68 per cent were due to other diseases | मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांपैकी ६८ टक्के रुग्ण अन्य आजाराने ग्रस्त

मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांपैकी ६८ टक्के रुग्ण अन्य आजाराने ग्रस्त

Next

निलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरातील एकूण व्यक्तींपैकी सुमारे ६८ टक्के रुग्ण प्रथमपासूनच अन्य आजारांनी ग्रस्त असल्याचे महापालिकेकडील नोंदीतून दिसून आले आहे़ कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून १४ जूनपर्यंत झालेल्या एकूण ८ हजार ४८१ मृत्यूंपैकी, केवळ कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २ हजार ५३३ इतकी आहे, तर यामध्ये दुसऱ्या लाटेतील मृत्यूची संख्या ही ३ हजार ७४५ इतकी आहे़

कोरोनाचा पहिला रूग्ण पुणे शहरात ९ मार्च २०२० रोजी आढळून आला व याच महिन्यात दोन जणांचे निधन कोरोनामुळे झाले़ त्यानंतर हा आकडा वाढत गेला व पहिल्या लाटेतील उच्चांक ठरलेल्या सप्टेंबर महिन्यात शहरात १ हजार १८२ जणांचा मृत्यू झाला़ त्यानंतर पहिली लाट ओसरत गेली़ परंतु, फेब्रुवारी, २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले़ पहिल्या लाटेपेक्षा ही लाट तुलनेने घातकच ठरली़ कारण पहिल्या अकरा महिन्यांत जेवढे रूग्ण आढळून आले, त्यापेक्षा अधिक रुग्ण या दुसऱ्या लाटेत शहरात आढळून आले़ दरम्यान, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या या साडेचार महिन्यांत अधिक राहिली असली तरी दुसरीकडे मृत्यूची संख्याही वाढली होती़

२०२१ मध्ये मार्च महिन्यात ४४७, एप्रिल महिन्यात १ हजार ४९५ व मे महिन्यात १ हजार ४५९ जणांचा बळी कोरोनामुळे गेला़ जूनपासून ही दुसरी लाट ओसरत आली असली तरी, १७ जूनपर्यंत शहरात २५३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे़ मात्र या सर्व मृत्युमुखी पडलेल्या कोरोना रूग्णांपैकी ६८ रूग्णांना अन्य आजारही होते़

----------------------

चौकट १ :-

शहरातील मृत्यूची संख्या :-

पहिली लाट २०२०

मार्च : २

एप्रिल : ८३

मे : २२९

जून : ३२९

जुलै : ६६९

आॅगस्ट : ९९२

सप्टेंबर : १ हजार १८२

आॅक्टोबर : ७४१

नोव्हेंबर : २३७

डिसेंबर : १६७

सन २०२१

जानेवारी : १३३

(कोरोनाची दुसरी लाट )

फेब्रुवारी : ९१

मार्च : ४४७

एप्रिल : १ हजार ४९५

मे : १ हजार ४५९

जून (१७ ता़ पर्यंत) : २५३

-----------------------

चौकट २ :-

मृत्यू झालेल्यांचे वयोगट

० ते २० वय : १० (पुरूष), १३ (महिला)

४० ते ६० वय : ३२८ (पुरूष), १५१ (महिला)

४० ते ६० वय : १ हजार ६०० (पुरूष), ८९४ (महिला)

६० ते पुढील वयोगटातील : ३ हजार ५८१ (पुरूष), १ हजार ९०४ (महिला)

--------------------------

Web Title: Of the coronavirus deaths, 68 per cent were due to other diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.