CoronaVirus News: डॉक्टर, नर्सचे हॉटेल बिल कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:21 AM2020-06-15T05:21:13+5:302020-06-15T05:21:49+5:30

पुण्यातील कोरोना योद्धे : जिल्हा आपत्तीचा निधी संपला

CoronaVirus Doctor nurses hotel bill in crores | CoronaVirus News: डॉक्टर, नर्सचे हॉटेल बिल कोटींच्या घरात

CoronaVirus News: डॉक्टर, नर्सचे हॉटेल बिल कोटींच्या घरात

Next

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : तीन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी आणि खासगी डॉक्टर, नर्सची रुग्णालयांच्या लगत विविध हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु हॉटेलमालकांनी प्रतिव्यक्ती प्रतिदिनसाठी तब्बल २ हजार रुपयांचा दर लावला आहे. यापैैकी एका हॉटेलने तब्बल ८६ लाख ७१ हजार रुपयांचे बिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडेसादर केले आहे. इतर हॉटेलसुद्धा अशीच बिले काढण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्हा आपत्ती प्रतिसाद खात्यामध्ये असलेला निधी इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च झाला असून, या व इतर हॉटेलची कोट्यवधी रुपयांची बिले कशी अदा करायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

पुण्यात सुरुवातीला एक महिना केवळ नायडू हॉस्पिटलमध्येच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. एप्रिलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढायला लागली. त्यामुळे प्रशासनाने ससून रुग्णालय व अन्य काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यासाठी सरकारीसह काही नामांकित खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करुन त्यांना कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास सांगण्यात आले. खासगी डॉक्टरांनी आपली राहण्याची सोय हॉटेलमध्ये करावी, अशी मागणी केली.

ससून रुग्णालयामध्ये काम करणाºया वरिष्ठ, निवासी डॉक्टरांसह नर्सची हॉटेलमध्ये सोय केली. सध्या ५०० ते ६०० सरकारी व खासगी डॉक्टर, नर्स यांची विविध हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

कोट्यवधींचे बिल भरायचे कुठून?
जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पुण्यासाठी ७२ लाख १२ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. यापैकी १४ लाख विभागीय व्यवस्थापक रेल्वे यांना विशेष श्रमिक रेल्वे खर्चासाठी, ६ लाख विश्वानंद परिपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सालय यांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना १५ लाख रुपये आणि पुणे शहर तहसीलदार यांना १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हॉटेल बिलांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे निधी शिल्लक नाही.

Web Title: CoronaVirus Doctor nurses hotel bill in crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.