coronavirus : महत्त्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 07:06 PM2020-03-12T19:06:07+5:302020-03-12T19:08:15+5:30
काेराेनाग्रस्त नागरिकांची संख्या पुण्यात आठवर गेल्याने गरज असेल तरच बाहेरगावच्या नागरिकांनी पुण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
पुणे : पुण्यात काेराेनाच्या रुग्णांची संख्या आठवर गेल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या भागातील रुग्णांना काेराेनाची लागण झाली आहे तेथील 3 किलाेमीटरच्या भागात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय पुण्याबाहेरील नागरिकांनी पुण्यात येऊ नये असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी केले.
काेराेनाच्या रुग्णांबाबत माहिती देण्याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते, यावेळी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर उपस्थित हाेते.
सर्व सरकारी कार्यक्रम व मेळावे रद्द करण्यात आले असून खासगी कार्यक्रम सुद्धा घेण्यात येऊ नये असे आवाहन राम यांनी केले. तसेच हाॅटेल व्यावसायिक आणि पर्यटन संस्थांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सुचना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जे काेराेनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या आसपासच्या परिसरातील साडेसहाशे फ्लॅटची तपासणी करण्यात आली आहे. ज्यांच्यामध्ये काेराेनाची लक्षणे आढळली असतील त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.