coronavirus : संचारबंदीच्या काळात पुणेकरांनी पाेलिसांना केले तब्बल पाच हजार काॅल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:41 PM2020-03-24T21:41:15+5:302020-03-24T21:42:29+5:30

संचारबंदीच्या काळात पुणे पाेलिसांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर पाच हजारांहून अधिक काॅल

coronavirus: during curfew five thousand calls to police by puneties rsg | coronavirus : संचारबंदीच्या काळात पुणेकरांनी पाेलिसांना केले तब्बल पाच हजार काॅल

coronavirus : संचारबंदीच्या काळात पुणेकरांनी पाेलिसांना केले तब्बल पाच हजार काॅल

Next

पुणे : संचारबंदीच्या काळात नागरिकांना आलेल्या अडचणणी समजून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी जाहीर केलेल्या ४ व्हॉटसअ‍ॅप नंबरवर गेल्या १२तासात तब्बल ५ हजार ७६४ दूरध्वनी आले. त्यापैकी २ हजार ५६० कॉल्सना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गंभीर आजार, हॉस्पिटल भेटी, तातडीचा विमानतळ प्रवास, आपत्कालीन परिस्थितीस प्राधान्याने मदत केली जात आहे. 

पोलिसांनी क्रमांक जारी करताच मंगळवारी सकाळपासून दूरध्वनीचा ओघ वाढला. त्यामुळे सेवा कक्षात ३ नियंत्रण कक्षाचे कर्मचारी, ३ सेवा कर्मचारी आहेत. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त देशमुख हे प्राधान्याने लोकांना दिलासा देण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. लॉकडाऊनमधून सूट दिल्या गेलेल्या कंपनी, उद्योग यांच्या तक्रार निवारण संदर्भात त्यांच्या विनंती ई मेलद्वारे घेण्यात आल्या आहेत. त्यांनी विहित नमुन्यात त्यांची माहिती दिल्यानंतर त्यांना डिजिटल परवाने दिले जात आहेत. कंपन्यांच्या कामकाजाबद्दल जिल्हा प्रशासनाने या आधीच प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कंपन्यांनी तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात आले आहे. 

टिष्ट्वटर, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप आणि punecitypolice.grievance@gmail.com पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरुन सतत नागरिकांना अद्ययावत माहिती दिली जात आहे. याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी कळविले आहे, आम्ही नागरिकांना कोणत्याही कारणाशिवाय इकडे तिकडे फिरु नये असे आवाहन करतो.  तसेच सर्वत्र उपलब्ध असलेल्या प्रतिबंधक सूचनांकडे लक्ष द्यावे. यामुळे पोलिसांना अडचणींचे निवारण करण्यासाठी प्राधान्याने काम करता येईल. तक्रार निवारण प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि सुरळीत राखण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत.

पाेलिसांनी जाहीर केलेले व्हाॅट्स अप क्रमांक 
9145003100
9168003100
8975953100
8975283100 

Web Title: coronavirus: during curfew five thousand calls to police by puneties rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.