coronavirus : पतीची इच्छा पत्नीने केली पुर्ण ; काेराेनाच्या लढ्यासाठी दिला 1 लाखाचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:10 PM2020-04-12T17:10:25+5:302020-04-12T17:11:55+5:30
पतीला देशासाठी काहीतरी करायचे हाेते, त्यांची ही इच्छा पत्नीने पुर्ण केली. काेराेनाच्या लढ्यासाठी दिला एक लाख रुपयाचा निधी.
पुणे: पती श्रीनिवास काळे यांची देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा अपुरी राहिली. कोरोना विरोधी लढ्यासाठी १ लाख रूपयांचा निधी देऊन त्यांची पत्नी सूधाताई काळे यांनी ती पुर्ण केली.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना बुधवारी दुपारी घरी बोलावून श्रीमती काळे यांनी या रकमेचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला. पंतप्रधान सहायता निधीत हा धनादेश जमा करण्याची विनंती त्यांनी आमदार शिरोळे यांना केली. पती श्रीनिवास व शिवगौरी काळे यांच्या स्मरणार्थ हा निधी देत असल्याचे त्यांनी शिरोळे यांना सांगितले. शिरोळे म्हणाले, काळे यांचे वय ८५ आहे. कोरोना विषाणूच्या सर्व.बातम्या त्या वाचतात. या विषाणूने देशच नाहीतर जग.संकटात आल्याची जाणीव त्यांना आहे. त्यांनी फोन केला व घरी कोणाला पाठवता येईल का म्हणून विनंती केली. कशासाठी म्हणून विचारले असता त्यांनी निधी द्यायचा आहे असे सांगितले. त्यानंतर मीच त्यांच्या घरी गेलो व निधीसाठी त्याचे आभार व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी देशासाठी काही करण्याची पती श्रीनिवास यांची इच्छा होती. ती पुर्ण करता येत असल्याचे समाधान होत असल्याचे बोलून दाखवले अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.